You are currently viewing वायरी भुतनाथ ग्रामपंचायत मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवले

वायरी भुतनाथ ग्रामपंचायत मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवले

माजी खासदार निलेश राणे यांच्या सामाजिक कामातून प्रेरणा घेऊन युवा उद्योजक केदार झाड यांचा सामाजिक उपक्रम

मालवण

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या सामाजिक कामातून प्रेरणा घेऊन मालवण वायरी येथील युवा उद्योजक केदार झाड यांनी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून केदार झाड यांच्या माध्यमातून रविवारी मालवण – तारकर्ली मुख्य रस्त्यावरील वायरी भुतनाथ ग्रामपंचायत मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

वायरी भूतनाथ येथे तारकर्ली मुख्य मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. खड्डेमय रस्ता मुळे अपघात होण्याची शक्यता होती. प्रशासनाच्या माध्यमातून काम होईलच. मात्र नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सामाजिक भावनेतून केदार झाड यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले आहेत.

रविवारी केदार झाड यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशांत मताई, संदीप बोडवे, समीर पाटकर, निखिल साळवी, विशाल वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. तसेच भाजप युवा मोर्चा पदाधिकारी राकेश अशोक सावंत यांचेही सहकार्य लाभले.

केदार झाड यांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. यापुढे निलेश राणे यांच्या प्रेरणेतून अधिक प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवून जनतेची सेवा करायची आहे. असे केदार झाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा