कणकवली
2मार्च 2023रोजी प्रसिध्दी पत्रकान्वये रस्ता डांबरीकरण कामात फेर बदलाचे गौडबंगाल काय ? या शीर्षकाखाली मी प्रसिध्दी माध्यमांना पत्रक देवून सर्वसामान्याच्या मनातील प्रश्न उपस्थित केला होता.त्याला कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सर्वेगोड यांनी एखाद्या कसलेल्या लोकप्रतिनिधी ना लाजवेल असे उत्तर दिले.
मुळात एम.पी .एम करताना हातफोडी लागते,ती करायला वेळ लागतो त्याऐवजी क्रशर खडी वापरून चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खाते काम करत होते,हे माननीय कार्यकारी अभियंता यांनी मान्य केले आहे.म्हणजे दार उघडे ठेवून भ्रष्टाचार चालू होता.जर अंदाजपत्रकात हातफोडी असेल तर ती वापरली च पाहिजे त्याशिवाय इंजिनिअरनी बी. एम रेकॉर्डिंग करता नये, मी हेच म्हणतो आहे ठेकेदार व अभियंता यांची मिलीभगत आहे.यावर कहर म्हणजे राजरोस हे करता यावे म्हणून कणकवलीचे सायंटिस्ट कार्यकारी अभियंता यांनी डायरेक्ट बी एम करायची शक्कल लढविली.म्हणजे यांच्या अगोदर असणाऱ्या कार्यकारी अभियंता यांनी जनतेचा पैसा फुकट घालवला असे होते,ते चुकीचे होते म्हणून अंदाजपत्रक बदलून या महाशयांनी ठराविक ठेकेदारांना मोठे करायचे ठरविले आहे.
बरं ठीक आहे बी एम पद्धतीने रस्ता केला तर त्याची किंमत प्रत्येक किलोमीटरला किती होते ते यांनी सांगितले नाही.माझ्या माहितीप्रमाणे किंमत वाढते.त्याही पुढे जावून सदर कार्यकारी अभियंता यांनी हमी द्यावी हे रस्ते 5 वर्षे किमान टिकतील तसे त्यांनी सँपल दाखवावे.नाहीतर मी सांगतो कनेडी फोंडा रस्ता एम .पी .एम पद्धतीने केला आहे त्यामुळे 4 वर्षे झाली एकही खड्डा नाही आहे.
तरी यावर विचार करावा नाहीतर मला अभ्यास करून कायदेशीर मार्गाने लढावे लागेल.
असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत यांनी म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी हमी द्यावी