विनामास्क फिरणार्‍यांवर कणकवलीत कारवाई…

विनामास्क फिरणार्‍यांवर कणकवलीत कारवाई…

१४०० रूपये दंड वसूल; नगरपंचायतीची मोहीम

कणकवली प्रातिनिधी
कणकवली शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाही विनामास्क फिरणार्‍या ७ जणांवर आज नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० प्रमाणे १४०० रूपयांचा दंड वसूल केला. नगरपंचायतीच्यावतीने आज अचानक पटवर्धन चौकात ही मोहीम राबविण्यात आली.
विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई केलेल्या नगरपंचायत पथकामध्ये प्रवीण गायकवाड, संजय राणे, श्री.कांबळे आदींनी सहभाग घेतला होता. शहरात पुढील काळातही विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान दुपारी १२ वाजता नगरपंचायत पथकाकडून विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांची पळापळ झाली. तर काहींनी आपल्या खिशातील मास्क, रुमाल लावून दंडात्मक कारवाईपासून बचाव केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा