You are currently viewing सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनात शहिद जवानांच्या वीरपत्नी व वीरमातांचा सत्कार

सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनात शहिद जवानांच्या वीरपत्नी व वीरमातांचा सत्कार

खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनाचे आयोजन;विठ्ठल पंचायतनाच्या वर्धापतन दिनाचे औचित्य

वेंगुर्ले

खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे देवस्थानच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शहिद झालेल्या जवानांच्या माता व पत्नीचा सत्कार समारंभ आमलकी एकादशी दिनी शुक्रवारी पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत, गोवा-मडगांव येथील उद्योजक महेश नायक, उल्हास सावंत, प्रदीप घाडी आमोणकर, मालवणचे उद्योजक विलास हडकर, कुडाळ येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी गुरुनाथ हेरेकर, उद्योजक राजाराम गावडे, सिध्दी विनायक मंगल कार्यालय वेंगुर्लेचे संचालक दिलीप मालवणकर, उद्योजक बाप्पा कवठणकर, माजी सरपंच श्यामसुंदर मुणनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहिद जवानांच्या वीरपत्नी व वीरमाता खास सत्कार करण्याचा व वीर जवानांची आठवण काढण्याचा एक चांगला उपक्रम विठ्ठल पंचायतनने आयोजित केल्याबाबत उपस्थित मान्यवरांतून पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत यांच्याबाबत गौरवोदगार काढले.

यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते शहिद शिपाई मालवण-पोखरण येथील धोंडी भिवा कदम यांचा पुतण्या तुषार तुषार कदम यांचा, सावंतवाडी-कलंबिस्त येथील शहिद नायक बाबली राजाराम राजगे यांचा मुलगा सूर्यकांत राजगे यानी, सावंतवाडी-पारपोली (देवसू) येथील शहिद सुभेदार अंकुश महादेव तेजाम यांच्या पत्नी सुप्रिया तेजाम यांनी, सावंतवाडी-सांगेली येथील शहिद शिपाई शांताराम महादेव कदम यांच्या पत्नी सविता कदम यांनी, सावंतवाडी-सबनीसवाडा येथील शहिद शिपाई रामचंद्र शंभा कुडतरकर सुनबाई सौ. रेश्मा कुडतरकर यांनी, मालवण-नांदोस येथील शहिद नायक तुकाराम गावडे यांच्या पत्नी प्रभावती गावडे यांनी, कणकवली-नेतर्डे येथील शहिद शिपाई सदाशिव बाईत यांचा मुलगा रविंद्र बाईत व सुन सौ. रश्मी बाईत यांनी, कुडाळ-माणगांव येथील शहिद शिपाई एकनाथ धोंडू नाईक यांच्या पत्नी विद्या नाईक, सावंतवाडी येथील शहिद शिपाई महादेव विष्णू नाईक यांचा भाऊ बाळकृष्ण नाईक आदींना साडी, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

तसेच्या महत्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित असलेले जेष्ठ पत्रकार देवयानी वरसकर, विकास गांवकर, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, विनायक वंजारे, भरत सातोस्कर, राजा सामंत, गोवा-मडगांवचे महेश नायक, प्रदीप आमोणकर, उद्योजक राजाराम गावडे, बाप्पा कवठणकर, विलास हडकर, दिलीप मालवणकर यांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन राजा सामंत यांनी केले, तर कार्यक्रमाच्या सुरवातीस गणेश वंदना व वीर जवानांवर देशभक्तीपर गीत आधारीत गीत देवगडची 12 वर्षाची मुलगी दुर्वा मनिष कुबल हिने सादर केले. या गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणांस उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटाने उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा