You are currently viewing हत्ती बाधितांची हॊणार बैठक

हत्ती बाधितांची हॊणार बैठक

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात हेवाळे पंचक्रोशीत हत्ती प्रश्न गहन असून त्यांचा बंदोबस्त न केल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते, याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून उपाययोजना करणे गरजेचे आहे,त्यासाठी याभागातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक भूमिका मांडली होती, यात शासनाला जर या हत्तींचा बंदोबस्त करता येत नसेल तर आम्हाला गोळ्या घालण्याची परवानगी द्यावी तसेच ३० मार्चची डेड लाईन देत नुकसान भरपाई नको आता हत्ती मुक्त अभियान राबवा अशी मागणी केली होती तसेच “गणपती बाप्पा मोरया” अभियान वनविभाग कार्यालयाच्या पुढ्यात राबवणार असल्याचे म्हटले होते, यावर इथले स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे एक्शन मध्ये आले असून त्यांनी थेट वनमंत्र्याना पत्र लिहीत हत्ती प्रश्नी स्थानिक ग्रामस्थ, संबधित अधिकारी तसेच हत्ती विषयीचे तज्ञ लोक यांची बैठक लावावी व कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात अनेक योजना आल्या मात्र त्या रखडल्या मात्र आता सर्वसामान्य जनतेचे सरकार असून हत्ती विषयी योग्य तोडगा काढू व हत्तींचा बंदोबस्त करु असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती दोडामार्ग तालुका शिवसेना तालुकाप्रमुख गणेशाप्रसाद गवस यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =