You are currently viewing भाजपच्या माध्यमातून विकास गंगा – अर्चना सावंत

भाजपच्या माध्यमातून विकास गंगा – अर्चना सावंत

माजगावात एक कोटीच्या नळ पाणी योजनेचे तेलींच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडी

माजगाव येथे एक कोटीची नळ पाणी योजना साकारली जात आहे. त्यामुळे भविष्यात गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या योजनेसह अन्य विकास कामाचे भूमिपूजन आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी विकास गंगा आली आहे, अशी प्रतिक्रिया या प्रसंगी बोलताना सरपंचा सौ. अर्चना सावंत यांनी दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब , आनंद नेवगी , मनोज नाईक ,माजगांव सरपंच सौ.अर्चना सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपसरपंच बाळा वेजरे , रिचर्ड डिमेलो,सर्व ग्रा.पं.सदस्य, अजय सावंत,श्याम कासार, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी उपस्थित होते. यावेळी गटार बांधणीच्या तीन कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 12 =