*अनिल परुळेकर यांच्या निधनाने मी एका सच्चा , निष्ठावंत कार्यकर्ता व माझ्या शुभचिंतक बुजुर्ग मित्राला मुकलो आहे.*
स्वर्गीय अनिल परुळेकर यांच्या निधनाची वृत्त ऐकून मला तीव्र दुःख होत आहे. तल्लख बुद्धीमता, वाचन व्यासंग, सामाजिक तळमळ असणारे अनिल परुळेकर हे माझे अनेक वर्षांपासून जवळचे मित्र होते. किंबहुना मी राजकारणात यावे व या भागाचे नेतृत्व करावे या साठी त्यांची मनोमन इच्छा होती जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आली.
समाजाप्रती संवेदनशील व नावीन्याचा ध्यास असलेला हा सच्चा हाडाचा कार्यकर्ता होता.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय अटलजी यांच्यावर त्यांची खूप श्रध्दा होती.
त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पेलण्याची शक्ती लाभो.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
सुरेश प्रभू