अजित नाडकर्णी फोंडाघाट, कणकवली यांची स्वरचित कविता
सर्विसिंग
मला नव्हते माहीत
तो रँप वाट पहात आहे
गेलो जरी बाजुने
आत ओढत आहे
ती भिन्न रात्र होती
नव्हती लाईट येथे
पडलो जरी त्यात
दैव बलवत्तर होते.
देवानेच वाचवला डावा हात
म्हणुनच आज लिहीत आहे.
जीवावरचे दु.ख
हातावरीच गेले
काळ होता समोरी
पण वेळ आली माघारी
हातावरी निभावले.तरी
दु.ख मोठे होते.
आज घेत आहे.विश्रांती
घरातीलच देत आहेत साथ.
त्या मोडलेल्या हाताला त्यातुनच
झाली मात.
झालेल्या गोष्टीतुनच शिकायचे असते.
त्यातुनच पुढे जायचे असते.
अजित लोकआवाज