You are currently viewing फेरीवाल्यांचा विचार करून आठवडा बाजाराचा निर्णय घ्यावा – अँड. संदीप निंबाळकर

फेरीवाल्यांचा विचार करून आठवडा बाजाराचा निर्णय घ्यावा – अँड. संदीप निंबाळकर

प्रशासनाला मोर्चा काढत दिले निवेदन

सावंतवाडी

आठवडा बाजाराची जागा आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना विचारात न घेता बदललेली आहे. इथला आठवडा बाजार हा ग्राहकांना सोयीचा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून एसटी स्टँड देखील जवळ आहे. त्यामुळे इथल्या आठवडा बाजाराला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जर आठवड्या बाजाराची जागा बदलून गैरसोयीची, वाहतुकीची अडचण, जिथे ग्राहक येत नाहीत अशा ठिकाणी जर आठवडा बाजार गेला तर तिथे कोणी ग्राहक येणार नसून व्यापाऱ्यांना उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे याचा योग्य विचार करून निर्णय घ्यावा यासाठी आज मोर्चा काढण्यात आल्याची माहिती अँड संदीप निंबाळकर यांनी दिली.श्री. निंबाळकर यांच्या उपस्थितीत नगर परिषदेवर फेरीवाला युनियनच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

याबाबत निंबाळकर म्हणाले की हा आठवडा बाजार आहे तिथेच असावा अशी या फिरत्या विक्रेत्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, जागा निश्चित करताना फिरत्या विक्रेत्यांचा व्यापार होईल अशीच जागा निश्चित करावी, आमदारकीला आम्ही देखील तुम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे फिरत्या विक्रेत्यांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावेत. व्यापाऱ्यांत भांडण लावून आपली राजकीय पोळी कुणी भाजू नये असा इशारा हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी देत फिरत्या विक्रेत्यांच्या १०१ सह्यांच पत्र न.प.च्या अधिकारी आसावरी शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशन जिल्हाध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, नाजिम पटेल, राजेंद्र लेंडगे, संदीप गौंड, इरसाद मालदार, सुमन वाडीकर, सुभाष चव्हाण आदी फिरते व्यापारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा