रस्ता तत्काळ दुरुस्ती करा, अन्यता आंदोलन छडणार – सज्जन रावराणे
वैभववाडी
वैभववाडी तरळे रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. जिल्ह्यातील ऊस तोडणी केलेला ऊस वाहतूक करण्यास ट्रक चालक विरोध नादुरुस्त रस्त्यामुळे केल्यास ऊस शेतकरी व जनतेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सज्जनकाका रावराणे यांनी दिला आहे.
रस्त्यावर पावसाळी डांबर टाकून रस्ता वाहतूक योग्य करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तरळे – वैभववाडी हा पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडणारा मुख्य मार्ग आहे.या मार्गावरून दरदिवशी हजारो वाहने ये – जा करत आहेत. या वर्षी पाऊस मोठया प्रमाणात पडला, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे.
वैभववाडी ते कणकवली, देवगड, जिल्हा मुख्यालय ओरोस असा दैनंदिन प्रवास करणारे शासकीय कर्मचारी व खाजगी वाहन चालकांना कंबरेचा व मानेचा त्रास होत आहे. तरळे हद्दीतील मार्गावर भंगार वाल्याने भंगार रस्त्यावर टाकले आहे. त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यावर बाजू घेतांना वाहन चालकांना त्रास होत आहे. रस्त्या वरील भंगार बाजूला करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा. सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडी मार्फत योग्य ती कार्यवाही करावी.अशी मागणी जनतेमधून केली जात आहे.
वैभववाडी – तरळे हा वर्दळीचा मार्ग आहे. दर दिवशी शेकडो वाहने या रस्त्यावरून जात असतात. रस्त्यांवर पावसाळी डांबर टाकून रस्ता दुरुस्ती तत्काळ करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, वैभववाडी यांच्या मार्फत नाधवडे येथील रस्त्यावर ठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यता अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कोकिसरे, नाधवडे गावच्या हद्दीत काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी येऊन रस्ता पावसात वाहून गेला आहे. अनेक वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत.
वैभववाडी-तरळे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वातुकीस निर्धोक करावा अशी मागणी वाहन चालक व जनतेमधून केली जात आहे.