अमरावती
मिशन आएएस या चळवळीला आता संपूर्ण भारतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास भारतातील 23 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे .ज्येष्ठ सनदी अधिकारी व मानव अधिकार आयोगाचे सदस्य श्री ज्ञानेश्वर मुळे आयएफएस यांनी मिशन आयएएस हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे .नुकतीच मिशन आय ए एस चे संचालक डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांची दिल्ली येथे भेट घेऊन मिशन आयएएसच्या कार्याचा परिचय करून दिला. दुसऱ्या वर्गापासून आयआयचे प्रशिक्षण ही कल्पना श्री मुळे साहेबांना आवडली व त्यांनी पुढाकार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रा. डॉ. नरेशचन्द्र काठोळे यांच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.विशेष म्हणजे या उपक्रमाचा प्रारंभ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत पब्लीक स्कुलपासून होत आहे. ज्ञानेश्वर मुळे हे भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत राहिलेले असून सध्या ते दिल्ली येथे मानव अधिकार आयोगाचे सदस्य आहेत. ते उत्कृष्ट लेखक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी डाँ.ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन .करिअर कट्टा व चांगुलपणाची चळवळ या तीन संस्थांची स्थापना केली आहे. या सर्व संस्थांच्या वतीने व कोल्हापूर जिल्हा इंग्रजी शाळा आसोशिएशनच्या सहकार्याने प्रा. डाँ. नरेशचंद्र काठोळे यांच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी (मुख्यमंत्र्याचे मा. प्रधान सचिव व विद्यमान प्रधान सचिव सांस्कृतिक विभाग यांचे गाव )गारगोटी गोकुळ शिरेगाव वडगाव पेठ शिरोली नरांडे कुंभोज अब्दुल लाट भोगाव बाजार वाकामे व कामसी सेनापती या गावातील विविध विद्यालयांमध्ये व महाविद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिशन आयएएसच्या वतीने संपूर्ण भारतात आतापर्यंत 15000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून मिशन आयएएसतर्फे दुसऱ्या वर्गापासून मुलांना आय ए एस चे प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमामध्ये आतापर्यंत भारतातील 43 हजार विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मिशन आयएएस घराघरांमध्ये पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे . एका जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल मिशन आयएएस तर्फे मानव सेवा आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे . प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003