देवगड
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सुरू असलेल्या टेंबवली कालवी रस्त्याचा कामाचा दर्जा न सुधारल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा टेंबवली कालवी येथील ग्रामस्थांनी दिला. याबाबतचे निवेदन तहसिलदार मारूती कांबळे यांच्याकडे देण्यात आले.
टेंबवली कालवी येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात टेंबवली कालवी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सुरू आहे मात्र काम समाधानकारक व गुणवत्तापुर्ण दिसून येत नाही.रस्त्याची बाजुपट्टी ढासळू लागली आहे.यामुळे प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासावी. जोपर्यंत अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे काम होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला बील अदा करू नये.
सध्या सुरू असलेल्या कामाची तातडीने पाहणी करावी व कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तहसिलदारांना निवेदन देतेवेळी पं.स.सदस्य सदाशिव ओगले, शरद शिंदे व टेंबवली कालवी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.