टाटा क्लासएजचे नवे “स्टडी ॲप”

टाटा क्लासएजचे नवे “स्टडी ॲप”

 

टाटा क्लासएज (टीसीई) या टाटा इंडस्ट्रीच्या देशातील पहिल्या शिक्षण तंत्रज्ञान संघटनेने राष्ट्रीय आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या भारतीय शाळांना पाठ्यपुस्तकांवर आधारित कन्टेन्ट उपलब्ध करून दिला आहे.

टीसीई चे हे १०वे वर्ष असून त्यांनी तयार केलेल्या वर्गात वापरावयाच्या सुविधा भारतातील जवळपास २ हजार शाळांमध्ये १.५ लाख शिक्षक व १७ लाख विद्यार्थी वापरत आहेत.

टीसीईने टाटा क्लासएज सोबत “स्टडी” (studi) ॲप सुरू केले आहे. थेट विद्यार्थी याचा वापर करू शकतात. यामध्ये नियोजन सराव आणि संकल्पना समजून घेऊन त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यावर भर देण्यात आला आहे.

टिसीई चे सीईओ मिलिंद शहाणे यांनी सांगितले स्वावलंबी विद्यार्थी तयार केले जावेत. यासाठी “स्टडी” ची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये फक्त काय अभ्यास करायचा यावर भर दिला गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा