You are currently viewing कुडाळ मथुरा आर्केट येथे दुचाकीने मागाहून ठोकर दिल्याने दोघे जखमी

कुडाळ मथुरा आर्केट येथे दुचाकीने मागाहून ठोकर दिल्याने दोघे जखमी

कुडाळ

आपल्या वसतीगृहात जात असताना कुडाळ ते वेंगुर्ले मार्गावर कुडाळ मथुरा आर्केट येथे मोटरसायकल स्वाराने मागून दिलेल्या ठोकरीत ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीसह गणेश पालकर (वय ३८, रा. पिंगुळी, करमळगाळू) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी मोटरसायकल स्वार गणेश पालकर यांच्या विरोधात कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै महाविद्यालयांमधील फिजिओथेरपीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सिद्धी अशोक नाईक, समृद्धी जावळे, ऋतुजा शिंदे या आपल्या वस्तीगृहाच्या दिशेने रस्त्याच्या डाव्या बाजूने येत होत्या. त्याच दरम्याने कुडाळ ते पिंगुळी या दिशेने गणेश पालकर आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन जात होता. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणाऱ्या ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीला या मोटरसायकलने मागवून ठोकर दिली. या धडकेमध्ये ऋतुजा शिंदे व मोटरसायकल चालक गणेश पालकर दोघेही जखमी झाले या दोघांनाही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.या अपघात प्रकरणी मोटर सायकल स्वार गणेश पालकर यांच्या कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा