*नालेसफाईला मार्च महिन्यात शुभारंभ*
*३१ मे पर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे लक्ष्य*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नालेसफाईच्या कामासाठी १८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामाला याच आठवड्यापासून सुरुवात केली जाणार असून मे अखेरपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागातील अधिकाऱ्याने दिली.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते. मात्र २०२२ मध्ये प्रशासक असल्याने निविदा प्रक्रियेला उशीर झाल्याने ११ एप्रिल रोजी नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नालेसफाईच्या पहिल्या टप्प्यात पावसाळापूर्व काम केले जाणार आहे. यामध्ये ३१ मेपर्यंत पहिला टप्पा संपणार आहे. हा कालावधी १ जून ते ३० सप्टेंबर असा राहणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात पावसाळ्यानंतर १० टक्के काम केले जाणार आहे.