You are currently viewing अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक प्रकरणी मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई

अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक प्रकरणी मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची कारवाई

मालवण:

 

वाळू उत्खननास परवानगी मिळाली असली तरी मालवण तालुक्यातील खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाकडून होणाऱ्या सततच्या कारवाईतून अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोमवारी रात्री तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बाबखोल मार्गावर अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन वाळू वाहतूक डंपर पकडले. तर आंबेरी खाडी किनारी अनधिकृत वाळू उत्खनन ठिकाणी तहसीलदार यांचे पथक पोहचताच वाळू उत्खनन करणाऱ्या कामगारांनी होड्यांसह पळ काढला. याच ठिकाणी वाळू भरणा असलेला एक डंपर सापडून आला आहे. पुढील कारवाईसाठी तीनही डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कार्यवाही सुरू होती. अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा