You are currently viewing बॅ. नाथ पै कॉलेज, पडोस येथे युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

बॅ. नाथ पै कॉलेज, पडोस येथे युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

बॅ. नाथ पै कॉलेज, पडोस येथे युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

नेहरू युवा केंद्रच्या माध्यमातून बॅ. नाथ पै कॉलेज पडोस येथे युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत पडोस युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. G20 राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे आल्याच्या निमित्ताने वसुधैव कुटुंबकम् एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या पडोस युवा संसद योजने अंतर्गत संसदेचे आयोजन G20 च्या थीमवर करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी युवांना मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. यावेळी कसाल हायस्कूलचे प्राध्यापक शंकरराव कोकितकर यांनी व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन करताना युवानी नव्या भारताचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन केले.

            भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी Life (Life for Environment) and International Year of Millets and Environment याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायबर पोलीस इन्स्पेक्टर बळीराम सुतार यांनी सायबर सिक्युरिटी विषयी माहिती देताना सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले तर एपीआय ट्रैफिक पोलीस अनिल वहत्कर यानी ट्रैफिक पोलिसांची भूमिका मांडत ट्रैफिक नियम समजावुन सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी G20 व Y20 समिट विषयी माहिती देत भारताची यामागील भूमिका स्पष्ट करून युवकांची जबाबदारी काय याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर बॅ. नाथ पै कॉलेज मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  बॅ.नाथ पै महिला कॉलेजचे प्राचार्य अरुण मर्गज बॅ. नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, परेश धोवाडे, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापक प्रणाली मयेकर तसेच नेहरू युवा केंद्राचे समन्वयक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा