मुंबई येथील खाजगी रुग्णालयात पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी.
खांबल कुटुंबाने मानले आ. नितेश राणे यांचे आभार.
वैभववाडी
अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या अरुळे येथील शुभांगी चंद्रकांत खांबल वय 55 या महिलेच्या पायावरील शस्त्रक्रिया कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या मदतीने पूर्णपणे मोफत पार पडली आहे. आजारात गेली काही महिने गांजलेल्या या महिलेसाठी आमदार नितेश राणे खरे देवदूत ठरले आहेत. खांबल यांच्या कुटुंबीयांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेत आभार पत्र सुपूर्द केले आहे.
अरुळे येथील चंद्रकांत खांबल हे मोलमजुरीची कामे करतात. संसाराचा गाडा चालवताना पत्नी शुभांगी या आजारी पडल्या. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आजारपणाचा खर्च त्यांना न झेपणारा होता. दोन वर्षांपूर्वी शुभांगी खांबल यांच्या पायावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र त्या आजाराने पुन्हा डोके वर काढले. मार्च महिन्यात पुढील उपचारासाठी शुभांगी यांना मुंबईला हलविण्यात आले. आ. राणे यांचे कट्टर कार्यकर्ते सुमित राणे यांच्या मध्यस्थीने शुभांगी यांचे पती व मुलगी सानिका यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे जाऊन ही कैफियत मांडली. सामाजिक कार्यकर्ते जाहीद खान यांनी शुभांगी यांना उपचारासाठी चर्नीरोड येथील खासगी रुग्णालयात हलविले. डॉ. शाकीर यांनी शुभांगी यांच्या पायावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.