मुक्ताईनगर / जळगाव :
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव वर्धापन दिन नुकताच विविध उपक्रमांनी आणि फाउंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांचे उपस्थितीत आनंदात उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्येची देवता शारदा माता व आदिशक्ती संत मुक्ताईच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्योतीताई राणे आणि श्री शांतारामजी कांडेलकर यांनी स्वागत गीत गायले . या प्रसंगी मान्यवरांचा गुलाब बुके व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा संपन्न झाली . याप्रसंगी फाउंडेशनचे सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे यांनी फाउंडेशनचा लेखाजोखा सादर केला व भविष्यात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी जळगाव जिल्हा व बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य त्याचप्रमाणे राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विविध जिल्ह्यांचे समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. फाउंडेशनला श्री तुळशीराम सदाशिव वावगे यांनी 1 लाख 25 हजाराची मदत केली होती. त्यामध्ये फाउंडेशनने गाव गाव फिरते वाचनालय या उपक्रमासाठी ओमनी गाडी खरेदी केली व त्या गाडीचे उद्घाटन सुद्धा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर दुपारच्या भोजनानंतरच्या सत्रामध्ये सुरुवात साखरखेर्डा येथील कवी रामदास कोरडे यांच्या कविता वाचनाने झाली. या वेळी औरंगाबाद येथील कवी अॅड सर्जेराव साळवे यांनी “देश कँसर मुक्त करू” व “आई” ह्या कविता सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील व बाहेरील 35 गुणवंत शिक्षकांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस. ए. भोईसर होते . याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनेशभाऊ पाटील, भाजपाचे सरचिटणीस विनोदभाऊ पाटील, पंचायत समिती मुक्ताईनगरचे सदस्य तथा फाउंडेशनचे सदस्य राजेंद्रभाऊ सवळे, राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश तराळ अमरावती, उपाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध लेखिका डॉ. प्र%