राणेंवर टीका करूनच वैभव नाईक, संदेश पारकर राजकारणात झाले मोठे
भाजप प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांची टीका
कणकवली
वैभव नाईक आणि संदेश पारकर यांनी ३० वर्षापूर्वीचा काळ आठवावा. आपण त्यावेळी बालिशपणाने केलेल्या वक्तव्याचे पडसाद काय, ऊमटले होते आणि, त्याचे परीणाम जिल्ह्यातील लोकांना काय भोगावे लागले होते, ह्याचा विचार करा. नाईक, पारकर दोघेही कोणतेही कर्तृत्व नसते वेळी फक्त नारायण राणेवर टीका करूनच राजकारणात मोठे झाले. आता काळ बदलला आहे पूर्वीचे दिवस राहीले नाहीत. आमदार म्हणून नाईक यांची कुवत काय आहे आणि संदेश पारकर काय करू शकतात हे सर्व जाणून आहेत. कोणतेही कर्तुत्व नसताना स्वार्थासाठी आयती पदे मिळाल्यामुळे आपले आकाशाला हात लागले असे वैभव नाईक व संदेश पारकर यांनी समजू नये. काळ बदलला आहे. तुम्हाला जनतेने ओळखले आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेपोटी हुरळून जाऊ नका.
१९९० मधील खासदारांच्या मिरवणुकीत जी बेताल व निंदनीय वक्तव्ये केली व त्यामुळे जिल्ह्यात काय वातावरण झाले हे विसरू नका असा टोला भाजप राज्य कमिटी सदस्य सुरेश सावंत यांनी लगावला आहेे. म्हणून जिल्ह्याबाहेरील गोष्टी जिल्ह्यात आणून वातावरण कलुशीत, करण्याचा प्रयत्न आपण दोघानीही करू नये, त्याचे जे परीणाम होतील त्याला आपण जबाबदार असाल, एवढे लक्षात असूदे, एक सामाजिक कार्यकर्ता महणून मी आपल्याला ही समज देत आहे, कारण आम्ही हे सगळ भोगले आहे असे राज्य कमिटी सदस्य सुरेश सावंत यांनी म्हटले आहे.