*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अभिमान मराठी*
माय मराठीची गोडी
मधाळ जिभेने चाखावी
ज्ञानेश्वरी गीता पुजावी
शान मराठीची राखावी
देवनागरी लिपीत
वर्णाक्षरे तिची सजली
काना मात्रा वेलांटीने
चौदाखडी गजबजली
शिक्षणाच्या माध्यमात
भाषा मराठी निवडावी
तिच्या लावण्याची कीर्ती
दूरदेशी पसरावी
सह्याद्रीच्या कपारीत
नाद मराठीचा घुमला
ओवी पोवाडे गाऊनी
ढोल संबळ दुमदुमला
*माझ्या मराठीचा अभिमान*
ज्ञानमाऊली शारदा आई
ज्ञान कलशातील मोती
माझ्या ओटी घालना माई
*🖊️© सौ आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ . सिंधुदुर्ग*