You are currently viewing व्योमगंगा

व्योमगंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल प्रावीण्य ग्रुपच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची अप्रतिम गझल रचना*

(वृत्त: व्योमगंगा)

प्रेम माया भावना ही माणसाची आटलेली
माय बापाची जराही जाण नाही ठेवलेली

ध्येय ज्यांचे जीवनाचे ..फक्त पैसा आणि पैसा
भाव भक्ती स्नेह माया ..आत त्यांच्या लोपलेली

आजही आनंद देते बालपण माझ्या मनाला
गोड साऱ्या भावनांची आठवण ती साठलेली

संकटांवर मात केली खूप जिद्दीने असावी
त्यामुळे तर आज दिसते ध्येयपूर्ती साधलेली

वाट खडतर जीवनाची चालताना त्रास झाला
पण तरीही एकटीने हिंमतीने चाललेली.

शोभा वागळे
मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + twelve =