You are currently viewing संस्कारक्षम पिढी घडवण्यास गुरुवर्य डी .आर.खवणेकर यांचा सिंहाचा वाटा…

संस्कारक्षम पिढी घडवण्यास गुरुवर्य डी .आर.खवणेकर यांचा सिंहाचा वाटा…

डॉ. सदानंद मालवणकर;डी.आर. यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण …

मालवण

स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुलचे तत्कालीन मुख्याध्यापक गुरुवर्य डी. आर. खवणेकर आणि त्यांच्या गुरुजनांच्या टीमने जे ज्ञानदानाचे कार्य केले त्या कार्यामुळेच एक संस्कारीत पिढी निर्माण झाली. संस्कारक्षम पिढी घडविण्यास गुरुवर्य डी. आर. खवणेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याने या ज्ञान मंदिरात वावरणाऱ्या शिक्षक आणि विध्यार्थ्यांनी स्वर्गीय गुरुवर्य खवणेकर सरांचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सदानंद मालवणकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रशालेचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य डी. आर. खवणेकर यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण स्वर्गीय डी. आर. खवणेकर यांचे पुत्र चंद्रशेखर खवणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सदानंद मालवणकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, कॉन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सुधीर हेरेकर, संस्थेचे उपाध्यक्ष बी. जी. गोलतकर, सह खजिनदार अभिमन्यू कवठणकर, संस्थेचे लोकल कमिटीचे अध्यक्ष दशरथ कवटकर, लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नऱ्होना, रवींद्र वराडकर , मुख्याध्यापक वामन खोत, माजी विध्यार्थी अरविंद म्हपणकर, प्रकाश कुशे, अंकुश करलकर, भाऊ हडकर, रमेश आचरेकर, विष्णू कोरगावकर, सौ. कुमुद मालवणकर, नीलम करंगुटकर, समर्थपल्लवी तारी – खानोलकर, मनोरमा खवणेकर, यतिन खवणेकर, योगेश मूळे, गीता खवणेकर, यथार्थ खवणेकर, मधुकर चव्हाण, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, माजी मुख्याध्यपिका सौ एस एस टिकम श्री. सदाशिव गावडे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापक खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर स्वर्गीय गुरुवर्य डी. आर. खवणेकर यांच्या कार्याचा आढावा प्रफुल्ल देसाई यांनी घेतला.

यावेळी बोलताना माजी विद्यार्थी डॉ सदानंद मालवणकर म्हणाले, आमचे मुख्याध्यापक गुरुवर्य खवणेकर हे हिंमतीचे आणि शिस्तीचे होते आणि त्यांचे सहकारी शिक्षक देखील त्याच ताकदीचे असल्याने या सर्वांनी मिळून आम्हाला घडवलेले आहे. मी एकटाच नव्हे तर असे कित्येक जण त्यांनी घडविले त्यामुळे खवणेकर गुरुजींचे विध्यार्थी त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये अव्वलच आहेत. खवणेकर सर हे हाडाचे शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट वक्ते, अतिशय कर्तव्यदक्ष शिक्षक होते. अभ्यासातच नव्हे तर त्यांच्या कारकीर्द मध्ये खेळामध्ये देखील भंडारी हायस्कुलचा पहिला नंबर लागायचा. अशा या गुरुवर्यांच स्मारक शाळेच्या आवारात असावे असे आम्हाला जेव्हा जेव्हा शाळेत यायचो तेव्हा तेव्हा वाटायचे. त्यामुळे खवणेकर सरांचे एक स्मारक असावे, त्यांचा एक मोठा फोटो असावा असे आमचे स्वप्न होते आज त्या स्वप्नांची पूर्तता होतेय गुरुवर्य खवणेकर सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कार्य केल्यास या शाळेचा नावलौकिक आणखी वाढेल असे ते म्हणाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी गुरुवर्य खवणेकर सरांचे व्यक्तिमत्त्व आदरणीय आणि अलौकिक असे होते आणि प्रत्येकजण शिकले पाहिजे ही त्यांची भावना होती. त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि त्याकाळी ही शाळा घडवली. त्याकाळी खवणेकरांची शाळा अशी लोकांनी ओळख बनली होती. या शाळेमध्ये आता अनेक उपक्रम सुरु आहेत त्या सर्व उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे सांगितले.

यावेळी रवींद्र वराडकर आणि बी. जी. गोलतकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी विध्यार्थी मधुकर चव्हाण यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पाटकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − twelve =