मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
‘प्रवाह – फ्लो’ या संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन २ ते ५ मार्च २०२३ या कालावधीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्टच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उद्घाटन २ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता होईल.
हायपरकनेक्टचे सहसंस्थापक अंकुर पुजारी हे प्रमुख पाहुणे असतील तर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, संकुल संचालक अशोक चव्हाण, अधीक्षका डॉ. मुक्तादेवी मोहिते, प्राचार्य आलम शेख व डॉ. मीनल राजुलकर हे यावेळी उपस्थित राहतील. हे प्रदर्शन शीव येथील संस्थेच्या ४थ्या आणि ५ व्या मजल्यावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळामुळे अशाप्रकारचा भव्य उपक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र जुलै २०२२ मध्ये ७५ फूट उंचीच्या कपड्यावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्तने स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर जागतिक छायाचित्रण दिनानिमित्तानेही कान्हेरी गुंफा येथे कार्यशाळा आयोजित केली गेली.