You are currently viewing थांगपत्ता मनाचा

थांगपत्ता मनाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*थांगपत्ता मनाचा*

धुंडाळता मनगर्भी
मूळ सापडे रोगाचे
देहावरी दृग्गोचर
अदृश्यशा कारणाचे

असे हमी इलाजाची
नाइलाज विज्ञानाचा
जेव्हा संपती उपाय
मन तळ शोधण्याचा

ताण तणाव असतो
तनावर, मनावर
जरा दाविता लक्षण
घ्यावे जाणूनी सत्वर

शक्ती अपार मनीची
असे सामर्थ्य अफाट
येता संकटे घेरून
मन दाखवीते वाट

देता कितीक उपमा
त्याही अपुऱ्या असती
अगणित विचारांची
नांदे तयात वसती

पुरवावे योग्य लाड
असो मनावर माया
मिळेलच थांग पत्ता
ठाव मनाचा गाठाया

भारती महाजन -रायबागकर
चेन्नई
97 63 20 43 31

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =