You are currently viewing रांगोळी

रांगोळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रांगोळी*

 

सुबक सुंदर

धवल शुभ्र रांगोळी

रेखताच आगळी

शोभा…

 

स्वच्छ परिसर

सडा संमार्जन अंगणी

प्रसन्न वदनी

रंगावली…

 

शुभ्र धवल

तेजस्वी चमचम रंग

मनात भावतरंग

भक्तीचे…

 

पवित्र चिन्हे

गोपद्म चक्र ,स्वस्तिक

तुळशीपाशी अधिक

खुलते…

 

अंगणातील ब्रम्हस्थानी

रेखावी रांगोळी सुंदर

रंगांचे आगर

शोभिवंत….

 

चिमटीत धरून

थेंब काढायचे प्रमाणात

रेषा जोडाव्यात

एकमेकांना…

 

कधी पानाफुलांची

रांगोळी काढावी मुक्त

व्हावे अनुरक्त

बघताच….

 

शोभायमान अंगण

अथवा लहानसा कोपरा

रांगोळीचा पसारा

आटोपशीर…

 

कलेची आवड

साध्य यातून होते

प्रसन्नता वाटते

चित्ताला….

 

हळदीकुंकू वाहून

करावे तिला नमन

हसरे सदन

सदोदित…..।।

 

~~~~~~~~~~~~~

 

अरुणा दुद्दलवार@✒️

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*”महालक्ष्मी तथास्तु मॉल” ची दिपावली स्पेशल ऑफर्स*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

यंदाची 🪔 *दिवाळी करा अजून स्पेशल*… 🎊🏮खरेदी करा..🛍️🔯 *महालक्ष्मी तथास्तु मॉल*🔯…मधून आपल्या प्रियजन आणि आप्तेष्टांसाठी खास आकर्षक वस्तू..🎁

 

एवढेच नाही तर *खरेदी सोबत मिळवा फ्री भेट वस्तू*..🎁🎊

 

*💥दिपावली स्पेशल ऑफर्स💥*

 

♦️ रू. १००० च्या खरेदीवर कॅडबरी सेलीब्रेशन फ्री🍫

♦️रू. २००० च्या खरेदीवर बेडशीट फ्री🛏️

♦️ रू. ३००० च्या खरेदीवर लंच बॉक्स फ्री🍱

♦️ रू. ५००० च्या खरेदीवर वॉटर जग फ्री🍶

♦️रू. १०००० च्या खरेदीवर डिनर सेट फ्री🍽️

♦️रू. १५००० च्या खरेदीवर साडी व बांगड्या फ्री🥻🚑

♦️रू. २०००० च्या खरेदीवर साडी व नेकलेस फ्री📿

 

👉 *‼️ऑफर २१ नोव्हेंबर पर्यंत मर्यादित‼️*

 

🎴आमचा पत्ता:- आदित्य बिझनेस सेंटर , पहिला व दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी

 

📱9860259376/ 9226249376

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 9 =