You are currently viewing दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी 1 मार्च पासून नवीन मालिका सुरु – नंदकिशोर काळे

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी 1 मार्च पासून नवीन मालिका सुरु – नंदकिशोर काळे

सिंधुदुर्गनगरी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी सध्या सुरु असलेल्या AQ या मालिकेतील अंतीम नोंदणी क्रमांक जारी केल्यानंतर AR ही नवीन मालिका दिनांक 1 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली  आहे.

         उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संगणकीय अभिलेख्यावर दुचाकी संवर्गासाठी सध्या सुरु असलेल्या AQ या मालिकेत सध्या 9559 हा नोंदणी क्रमांक सुरु असून सदरची मालिका पुढील आठवड्यात म्हणजेच साधारणतः 1 मार्च 2023 पर्यंत संपेल असा अंदाज असून त्यानंतर म्हणजेच दिनांक 1 मार्च 2023 पासून वाहन वितरकांना दुचाकी नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु करणे अनिवार्य आहे.

                        महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54 मध्ये नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्याबाबत तरतुद विहीत करण्यात आलेली आहे. या नियमातील नियम अ (3) मध्ये शासनाने विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे फी प्रदान केल्यावर, नोंदणी चिन्हांमधून, मोटार वाहनांच्या मालकासाठी त्यांच्या पसंतीचे नोंदणी चिन्ह राखून ठेवील तसेच नियम अ (7) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या फीच्या तिप्पट दराने फीचे प्रदान केल्यावर वाहनाच्या कोणत्याही वर्गासाठी, इतर कोणत्याही मालिकेतून नोंदणी चिन्हे नेमून देता येतील याप्रमाणे तरतुद केलेली आहे.

            उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी संवर्गासाठी सुरु होत असलेल्या AR या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54 अ मध्ये राखीव ठेवण्यात आलेली नोंदणी चिन्हे तसेच अनाकर्षक नोंदणी क्रमांक विहीत केलेले शुल्क भरुन राखीव करण्यात यावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना याव्दारे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा