You are currently viewing मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाख निधी मंजूर 

मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाख निधी मंजूर 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान : माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मालवण शहरासाठी भरीव विकास निधी

मालवण

महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजना २०२२/२३ अंतर्गत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत मालवण शहरासाठी भरीव विकास निधी उपलब्ध झाला आहे.

मालवण शहरातील ३१ विकास कामांसाठी ६ कोटी ५२ लाखाची कामे मंजूर करून जिल्हा नियोजन कडून निधी उपलब्ध करून घेतला आहे. याबाबत माहिती मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा