*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🌹मातृभाषा दिन*🌹
मातृभाषा दिन|
आपली मराठी|
बोलायला मोठी|
गोड आहे||१
लिहिणे वाचणे|
मातृभाषेतून|
येते उमजून|
लवकर||२
आपल्या भाषेचा|
ठेऊ अभिमान|
करू गुणगान|
मराठीचे||३
चुकले लागले|
पडले अडले|
शब्द मुखी आले|
मराठीत||४
मराठी जगवा|
राखा अभिमान|
भाषेची ही शान|
सांभाळावी||५
बोल मराठीचे |
अमृतासमान|
सखोल चिंतन|
मातृभाषी||६
काव्य गंध असा
गोड शब्दमध
करू काव्यबध्द
मराठीत||७
🌹🌿🌸🌿🌹🌿🌸🌿
अरूणा दुद्दलवार@✒️