You are currently viewing कृतार्थी प्रचिती

कृतार्थी प्रचिती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृतार्थी प्रचिती*
*************

मोहपाशातुनी गुंतता
उलघाल , भावनांची
भांबावते , मन बावरे
द्विधावस्थाच मनाची….

सावरावे , कसे जीवा
घुसमट ती स्पंदनांची
नेत्री आभाळ रंगलेले
आसक्तीच चराचराची….

घुटमळल्या पद्न्यासी
संगत तुझ्या सावलीची
नाद छुमछुम पैंजणांचा
चाहुल निर्मली सुखाची….

भास सारा सांजभारला
मिठी जणु द्वैतअद्वैताची
आता चैतन्य सुखावलेले
प्रचिती कृतार्थ जीवनाची….
**********************
*रचना क्र.२० / २ /२०२४*
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
*📞(9766544908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − two =