भवानी पतसंस्थेच्या सोने तपासणी मशिनचे उद्घाटन…
बांदा
व्यावसायिक स्पर्धेतही येथील श्री भवानी पतसंस्थेने सहकारच्या माध्यमातून ग्राहकांत विश्वासार्हता निर्माण केली. बनावट सोन्याची पारख करता यावी यासाठी बांद्यात पहिल्यांदाच सोने तपासणी मशीन खरेदी करत ही विश्वासार्हता अधिक जपली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच आपल्या पाठीशी असून भविष्यात सहकार वृद्धिंगत करण्यासाठी बँक आपल्याला निश्चितच पाठबळ देईल असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केला.
श्री भवानी पतसंस्थेत सोने तपासणी मशीनचा शुभारंभ श्री. काळसेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, ‘सकाळ’चे येथील प्रतिनिधी निलेश मोरजकर, संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आलमेडा, संस्थापक अध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, संचालक अशोक देसाई, सालू परेरा, संजय नाईक, राजेंद्र वाळके, सौ. रेश्मा आईर, व्यवस्थापक भिकाजी गवस, सावंतवाडी अर्बन बँकेचे बांदा शाखा व्यवस्थापक आबाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष श्री आलमेडा यांनी स्वागत केले. यावेळी श्री. काळसेकर यांच्या हस्ते सोने तपासणी मशीनचे फित कापून उदघाट्न करण्यात आले.
सरपंच श्रीमती नाईक म्हणाल्या की, श्री भवानी पतसंस्था ही ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देत असून या पतसंस्थेने ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी शाखा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या बनावट सोने बँकेत ठेऊन पैसे उकळण्याच्या घटना राष्ट्रीयकृत बँकात घडल्या आहेत. त्यामुळे वेळीच सावध होत भवानी पतसंस्थेने सोने तपासणी मशीन सुरु केली हे कौतुकास्पद आहे.
यावेळी बँकेचे ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले