*डॉ. देवी यांची भाषाविषयक निरीक्षणे आणि संशोधन*
*संकलन : बाबू फिलिप्स डिसोजा*
देवी यांच्या संशोधनामुळे असंख्य देशी भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचं स्पष्ट झालं. नामशेष होत जाणाऱ्या या भाषांच्या दस्तावेज संवर्धनाचं काम त्यांनी हाती घेतलं. आजच्या घडीला देवी यांना भाषाप्रभू म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
हिमाचल प्रदेश राज्यात बोलल्या जाणाऱ्या 16 भाषा त्यांनी शोधून काढल्या. या भाषांमध्ये बर्फासाठी 200 प्रतिशब्द आहेत. भूतलावर अवतरलेला चंद्र अशा आशयाचे अलंकारिक शब्द बर्फासाठी योजले जातात.
राजस्थानात सातत्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमणा करणारी मंडळी शुष्क वातावरणाचं वर्णन करण्यासाठी विविध शब्दांचा वापर करतात. यांचा उपयोग करताना माणूस आणि प्राणी भिन्न पद्धतीने ओसाड आणि वैराण वातावरणाला सामोरे जातात अशाही संकल्पनेचा वापर होतो.
इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून बदनाम केलेल्या प्रजातींची मंडळी गुप्त स्वरुपाची भाषा बोलतात. भटक्या समाजाच्या या व्यक्तींना गाव नाही. राहण्याचं विशिष्ट ठिकाण नसलेली ही मंडळी आता दिल्लीत असतात. त्यांच्या समाजाला लागलेला बट्टा आजही कायम आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या काही तासांवर असलेल्या गावांमध्ये (कोर्लई जि. रायगड)कालबाह्य ठरलेली पोर्तुगीज भाषा बोलली जाते.
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या मात्र मुख्य भूमीपासून विलग असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर करेन भाषा बोलली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भाषा प्रत्यक्षात म्यानमारची आहे. गुजरातमधल्या काही गावांमध्ये चक्क जपानी भाषा बोलली जाते. भारतात तब्बल 125 विदेशी भाषा मातृभाषा म्हणून अस्तित्वात आहेत.
– 1961च्या जनगणनेनुसार भारतात 1, 652 भाषा अस्तित्वात होत्या.
– द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार 2010 मध्ये देशात 780 भाषा होत्या.
– यापैकी 197 भाषांचं अस्तित्व धोक्यात आहे तर 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
– पूर्वांचलात अरुणाचल प्रदेश आणि आसाम, पश्चिम प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरात, पूर्व भागात ओरिसा आणि बंगाल तर उत्तरेकडे राजस्थानमध्ये सर्वाधिक भाषा बोलल्या जातात.
– देशात वापरात असलेल्या 68 लिपी आहेत.
– भारतात 35 भाषांमध्ये वृत्तपत्रे प्रकाशित होतात.
– हिंदी ही भारतात सर्वाधिक (40 टक्के) लोकांची बोली भाषा आहे. त्यानंतर बंगाली (8 टक्के), तेलुगू (7.1 टक्के), मराठी (6.9 टक्के) आणि तामीळ (5.9 टक्के) या भाषा अनुक्रमे बोलल्या जातात.
– सरकारतर्फे चालवलं जाणारं ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात आकाशवाणी 120 भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करतं.
– भारताच्या संसदेत देशभरातल्या भाषांपैकी केवळ 4 टक्के भाषांचं प्रतिनिधित्व होतं.
(स्रोत : भारतीय जनगणना 2001 आणि 162, युनेस्को, पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया 2010)
भाषेची ताकद जाणवली तेव्हा
याच काळात डॉ. देवींना भाषेच्या ताकदीची जाणीव झाली. 1998मध्ये स्थानिक भाषेत लिहिलेल्या नियतकालिकाच्या 700 प्रती घेऊन डॉ. देवी आदिवासी भागात गेले.
फक्त 10 रुपये देऊ शकणारी कोणीही व्यक्ती हे पुस्तक घेऊ शकते असं त्यांनी सांगितलं. दिवसाच्या शेवटी एकही पुस्तक शिल्लक राहिलं नव्हतं.भाषा लयाला का जाते?
संघटनेचं सर्वेक्षण आणि तपशीलवार अभ्यास मांडणाऱ्या 100 पुस्तकांपैकी 39 पुस्तकं याआधीच प्रकाशित झाली आहेत. 35,000 पानांचा मजकूर प्रकाशनासाठी तय्यार आहे.
भाषा लयाला का जाते?
संघटनेचं सर्वेक्षण आणि तपशीलवार अभ्यास मांडणाऱ्या 100 पुस्तकांपैकी 39 पुस्तकं याआधीच प्रकाशित झाली आहेत. 35,000 पानांचा मजकूर प्रकाशनासाठी तय्यार आहे.
तुटपुंजा राजाश्रय अर्थात सरकारी पाठिंबा, विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची कमी होणारी संख्या, स्थानिक भाषेत मिळणारं निकृष्ट दर्जाचं प्राथमिक शिक्षण तसंच जातीजमातींचं त्यांच्या मूळगावाहून होणारं स्थलांतर अशा विविध गोष्टींमुळे भाषा लयाला जाते.
भाषा नष्ट होणं ही सांस्कृतिक हानी आहे. भाषा लुप्त होण्यानं दंतकथा, खेळ, संगीत, खाण्यापिण्याच्या पद्धती असं सगळंच रसातळाला जातं.
भाषिक लोकशाही
सत्ताधारी भाजप पक्षाचा संपूर्ण देशात हिंदी भाषा प्रमाण करण्याचा हट्ट भाषांच्या वैविध्याला थेट खीळ बसवणारा आहे, असं गणेश देवी सांगतात.
‘वर्चस्ववादी राजकारणाच्या काळात वेगवान स्पंदनं असणारी शहरं भाषिक वैविध्याला कसे सामोरे जातात हे पाहणं रंजक आहे. भाषा मृत्यूपंथाला लागली की मला फार वाईट वाटतं. भाषा लुप्त होणं म्हणजे भात किंवा माशाच्या प्रजाती नाहीसं होण्यासारखं आहे. हे नुकसान गहिरं आहे’, असं डॉ. देवी सांगतात.
(साधार-सौजन्य-बी बी सी)
संकलन-बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४