You are currently viewing मी छत्रपती बोलतोय

मी छत्रपती बोलतोय

*जागतिक साहित्यिकाला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार (आण्णा) लिखित अप्रतिम लेख*

 

*मी छत्रपती बोलतोय*

🚩🚩🕉️🕉️🚩🚩

राम एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने हलाखीच्या परिस्थितीत फारसा शिकलेला नव्हता पण कसातरी चौथी पास केली होती त्याने. आजच्या आणि पूर्वीच्या शिक्षणात बदल फारसा नव्हता पण शिक्षक आणि विद्यार्थी यात खुप फरक आहे. त्यावेळी जर अभ्यास केला नाही तर बसता येणार नाही इतके फटके मिळायचे. त्यामुळे तो जे शिकला ते खूप धास्तीने आणि शिस्तीने शिकला. भवतालच्या वातावरणात इंग्लिश चा बोलबाला नव्हता आणि शिवाय पाचवी पासुन इंग्रजी विषय अभ्यासाला होता. जन्मतः कानावर पडलेल्या शाळेतील घोषणांचा मनावर खोल प्रभाव पडला होता पण त्यांच्या विषयी शाळेत शिकायला मिळत नव्हते. राम चौथीत असताना त्याला एक पुस्तक मिळाले त्याचे नाव होते.

🚩🚩 *शिवछत्रपती* 🚩🚩

अगोदर घोषणा कानी पडल्या कारणाने त्या बद्दलची उत्सुकता वाढली होती. राम ने पहिल्या धड्यापासून संत मंडळीच्या बद्दल महिती घेत घेत पुढील पाने चाळत गेला. मग शहाजी राजे भोसले पासुन सुरु झालेला प्रवास महाराणी ताराबाई यांच्या पर्यंत येऊन पोहचला. पण त्याच्या काळजात घर करून गेले ते छत्रपती शिवाजी महाराज. तो कधी कुठेही अडचणीत सापडला की त्याला छत्रपती आठवायचे. तो चौथीत असताना वडील वारले आणि घरची परिस्थिती सावरण्यासाठी रामने शाळा सोडली. आता तो एक कुशल शेतकरी आणि सोबत प्रपंच चालवण्यासाठी दुकान चालवत होता. दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा पाठ करायचा. भरदार शरिरसृष्टी देखाण्या रूपाचा राम हा त्या दिवशी जणु दिवाळीच साजरी करायचा. लोकं त्याचा तो उत्साह पाहून त्याला छत्रपतींचा मावळा म्हणायचे. ते शब्द कानी पडले की तो भारावून जायचा. गावात वर्गणी गोळा करून कार्यक्रम करायचा. एका जयंतीला शाळेत कार्यक्रम बघायला गेला असता त्याला दिसले की लोक महाराजांच्या फोटोला हार घालून वंदना देत आहे भाषणे होत आहे. पण एक पुढारी बोलतांना विषय सोडुन बोलायला लागला. त्याने सगळ्या भाषणात फक्त सत्तेची खिचडी शिजवली. राम तो एकटक पाहत होता. त्याच्या मनात तगमग होत होती. तो तेथून थेट घरी पोहचला. जेवायला बसला पण जेवण जात नव्हते. आईने विचारले पण काहीच न बोलता दोन चार घास खाऊन ताटावरून उठून गेला. संध्याकाळी जेवण न करता तसाच झोपला. झोपेत त्याला जाणवलं की आपल्या भवताली घोड्यांच्या टापांचा आवाज येत आहे. कोणीतरी म्हटले की काय झाले सेनापती. राम झोपेत म्हणाला महाराज आपण! मानाचा मुजरा करत राम म्हणाला राजे तुम्ही गेले तसे तुमचे मावळे फितुरीची भाषा बोलायला लागले. राजे म्हणाले की हे तर बाळराजे धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पण एक सांगु का मी स्वराज्य स्थापन करताना ह्या गोष्टीचा विचार केला नाही आणि त्यावेळी जे पक्षपाती आणि शासन विरोधी होते त्यांची गय पण केली नाही. मी ज्या मावळ्यांच्या मदतीने स्वराज स्थापन केले होते ते पराक्रमी होते त्यांच्यात जात पात धर्म स्वार्थ आणि सत्तेचा लोभ नव्हता. हो महाराज बरोबर बोललात तुम्ही. कारण आता तुमच्या राज्यात आमचं दैवत म्हणजे आपला पुतळा बसवायला राजकारणी लोकांच्या शरण जावं लागतं. स्वार्थासाठी लालची राज्यकर्ते आश्वासन देतात. कार्यकर्ते पाठिंबा देतात. मला सांगा महाराज आपल्या राज्यात ही दशा झाली आहे आपली. स्वार्थी लोकांनी आपल्या राज्याला ग्रहण लावले आहे. काही मावळे एकजुटीने काही प्रयत्न करतात पण नेते कामे होऊ देत नाही महाराज. *महाराज म्हणाले हो खरं आहे तुझं राम, कारण आता शिवा काशिद सारखे दुसरे शिवजी आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे नरवीर होणे शक्य नाही*. *कारण इतिहास आणि वारसा विसरलेली पिठीच छत्रपतींच्या वेशात फिरताना दिसत आहे*. माझे सर्व मावळे मला प्रश्न करतात की महाराज यांच्यासाठी आपण आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या का आणि मी निरुत्तर होऊन जातो. असेच अजून खूप बोलायचे होते महाराजांना पण. इतक्यात जाग आली आणि महाराज आणखी काय बोलणार होते ते एकायचे राहूनच गेले. सकाळी रामने हा सगळा वृत्तांत आपल्या आईला सांगितला तेंव्हा आई म्हणाली की बाळ महाराज बोलत नाही रे आता. *पण राम सांगत होता की रात्री महाराज म्हणत होते की मी छञपती शिवाजी महाराज बोलतोय*.

महाराज अजुनही स्वप्नात भेटत असतात आपल्या खऱ्या मावळ्यांना

रामदास आण्णा

गाव. तिर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर मासरुळ जिल्हा मातृतीर्थ बुलडाणा

प्रतिक्रिया व्यक्त करा