You are currently viewing सोलापूर जिल्हा महात्मा फुले जन आरोग्य योजना – आयुष्यमान भारत योजना

सोलापूर जिल्हा महात्मा फुले जन आरोग्य योजना – आयुष्यमान भारत योजना

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबिलाल मुंडे लिखित लेख*

 

*सोलापूर जिल्हा महात्मा फुले जन आरोग्य योजना –  आयुष्यमान भारत योजना*

 

सोलापूर जिल्हा हा पूर्वी दुर्गम आणि डोंगराळ भागांत येत होता. पूर्वी छोटी छोटी खेडी वाड्या वस्त्या. दूरवर वैद्यकीय सेवा साधने नाहीत. लोकांना रात्री अपरात्री उपचार घेणे अवघड होत होते. काळ बदलला आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांच्या याच वैद्यकीय अडचणी दूर करण्यासाठी राजकीय. शासकीय. यंत्रणा. सज्ज झाली आणि गाव तिथ दवाखाने सुरू झाले त्यामुळे लोकांना उपचार मिळणे सुखकर झाले. आजही सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये वैद्यकीय सेवा साधणं पोहचली नाहीत अशीही काही गाव आज आहेत तो फक्त अपवाद म्हणावा लागेल.

लोकांचे अलिकडच्या काळात खाणं बदलला भाजीपाला फळे जंगफूड. असे केमिकल युक्त पदार्थ लोकांच्यात खाण्यात वाढले आणि त्यामुळे. ब्लड प्रेशर. मधूमेह. कॅन्सर. वजन वाढणे. अवेळी केस गळणे. अवेळी वयोवृद्ध होण. आणि यामुळेच लोकांची कमाई दवाखान्यात औषध खरेदी साठी खर्च होण्यास सुरुवात झाली यातूनच लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे लोकांना पोटभर अन्न सुध्दा मिळतं नाही. गोरगरीब सर्वसामान्य लोक यांना उपचार विना मरावं लागतं आहे. यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात धर्मादाय आयुक्त यांचेकडून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून वर्षाला ठराविक पॅकेज देवून गोरगरीब दुर्बल लोकांना मोफत उपचारासाठी धर्मादाय निर्मिती दवाखाने उभे केले आहेत. त्यानुसार या दवाखान्यात कोणत्या उपचारासाठी किती खर्च करणे गरजेचे आहे.

धर्मादाय म्हंजे महात्मा फुले जन आरोग्य. आयुष्यमान भारत. योजनेमधून दुर्बल गोरगरीब लोकांना त्यांच्या हक्कांचा रास्त आणि ऐच्छिक उपचार मिळावा यासाठी प्रत्येक दवाखान्याना काही नियम अटि शर्ती घालून दिल्या आहेत.
(१) दवाखान्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना. आयुष्यमान भारत. यांची माहिती देणारे योजना मित्र यांची नेमणूक करण्यात यावी.
(२) योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या आजारांवर मोफत उपचार केले जातात यांची यादी दवाखान्यात लावणे कायद्याने बंधनकारक आहे.
(३) रुग्ण व त्यांचे हक्क व अधिकार यांचें हणन करणे कायद्याने गुन्हा आहे.
(४) योजनेअंतर्गत कोणत्या आजारांसाठी किती रक्कम निश्चित केली आहे याचे माहिती फलक लावणे गरजेचे आहे.
(५) योजनांची पूर्णपणे माहीत रुग्णांना कळविणे दवाखान्यातील लोकांचे कर्तव्य आहे.
(६) योजनांच्या नावाखाली भरमसाठ बिल वसूल करणारे दवाखाने डॉ यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे ‌
(७) जिल्ह्यातील सर्व योजनेअंतर्गत उपचार करणारे दवाखाने यांचीही माहिती स्पष्ट करण्यात यावी.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत सामजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील कोणीही विना औषध उपचार घेता कोणीही मरु नये यासाठी वरील योजनांचा आविष्कार सरकारने केला आहे. त्यानुसार रेशनकार्ड पिवळ असो. वा केशरी शिधापत्रिका. पांढरी शिधापत्रिका. यापैकी कोणतीही शिधापत्रिका असेलतर आणि ज्यावर उपचार करायचा आहे त्याचे नाव शिधापत्रिका मध्ये असेल तर त्याचा एक लाख पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंत उपचार मोफत करण्याचा शासन निर्णय आहे. जात जनगणना 2011 अंतर्गत नोंदणीकृत कुटुंबामधील PMJAY सदस्य संगणीकृत ई-कार्ड आणि फोटो ओळखपत्र दाखऊन सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत. ई-कार्ड आणि फोटो ओळख पुरावा असलेल्या कोणत्याही राज्यातील PMJAY चा लाभार्थी इतर कोणत्याही राज्यातील कोणत्याही पॅनेलीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे व अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. लाभार्थीच्या फोटोसह आधारकार्ड, आधार नोंदणी स्लीप आधार कार्डचा ओळख दस्तऐवज म्हणून आग्रह धरला जाईल आणि आधारकार्ड / क्रमांक नसतानाही, आधारकार्ड जारी करण्यासाठी स्वीकारले जाणारे कोणतेही कागदपत्र देखील स्वीकारले जातील.
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
शाळा / कॉलेज आयडी
पासपोर्ट
स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र
RGJAY / MJPJAY चे हेल्थ कार्ड
अपंग प्रमाणपत्र
फोटोसह राष्ट्रीय बँकचे पासबुक
जेष्ठ नागरिक केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले कार्ड 12. सैनिक बोर्डाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
सागरी मत्स्यपालन ओळखपत्र ( महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालय / मत्स्यव्यवसाय विभागाव्दारे जारी केलेले)
महाराष्ट्र सरकारच्या / भारत सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा
आयुष्मान भारत PM-JAY या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील उपचारांसाठी प्रती कुटुंब प्रतिवर्षी 5 लाख रुपये एवढा लाभ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला फ्लोटर आधारावर उपलब्ध आहे. योजनेमध्ये 34 प्रकारच्या विशिष्ट उपचारांच्या संदर्भात कॅशलेस उपचारांव्दारे वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियेसाठी हॉस्पिटलायाझेशन कव्हर करण्यासाठी हि पॅकेज वैद्यकीय विमा योजना आहे. MJPJAY लाभार्थ्यांना 121 फॉलोअप प्रक्रीयेसह 996 वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेचा लाभ मिळतो आणि PMJAY लाभार्थ्यांना 1209 वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियांचा व अतिरिक्त 213 वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रिया, 183 फॉलोअप प्रक्रियांचा लाभ मिळतो. 996 MJPJAY प्रक्रियेपैकी 131 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत आणि PMJAY 1209 प्रक्रियेसाठी अतिरिक्त 37 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत. 1209 पॅकेजसमध्ये जनरल वार्ड मधील बेडचे शुल्क, नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क, सर्जन आणि एनेस्थेटीस्टचे शुल्क, मेडिकल प्रक्टिशनर, आणि सल्लागार शुल्क, ऑक्सिजन, ओटी आणि आयसीयु शुल्क, सर्जिकल उपकरणांची किंमत, औषधांची किंमत, डिस्पोजेबल, उपभोग्य वस्तू, प्रत्यारोपण, प्रत्यारोपणाचे शुल्क समाविष्ट आहे, उपकरणे, रक्त देण्याची किंमत (राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रदान केले जाणारे रक्त) क्ष-किरण आणि निदान चाचण्या, आंतररुग्णांना अन्न, राज्य परिवहन किंवा दुसऱ्या श्रेणीचे रेल्वे भाडे (फक्त रुग्णालयापासून रुगांच्या निवासस्थानापर्यंत) या पॅकेजमध्ये रुग्णांच्या रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याच्या तारखेपासून रुग्णाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च समविष्ट आहे, ज्यामध्ये काही गुंतागुंत असेल तर रुग्णाचा व्यवहार खरोखर कॅशलेस होईल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेच्या सबंधित संपूर्ण महत्वाची माहिती आम्ही या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आपल्याला आणखी माहिती जाणून घायची असेल तर या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा खालीलप्रमाणे हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती मिळऊ शकता.
155388
18002332200
Official Website :- jeevandayee.gov.in
List of Id Proofs :- Click Here
मोफत उपचाराचे सोलापूर जिल्ह्यातील काही दवाखाने आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. हॉस्पिटलनिहाय लाभार्थी
यशोधरा हॉस्पिटल, सोलापूर (105), जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी (51), श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर (500), अश्‍विनी सहकारी रुग्णालय सोलापूर (105), अश्‍विनी ग्रामीण मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कुंभारी (168), श्री मार्कंडेय रुग्णालय, सोलापूर (343), चंदन न्यूरो सायन्स सेंटर,(सीएनएस) सोलापूर (73), धनराज गिरजी हॉस्पिटल, सोलापूर (68), गंगामाई हॉस्पिटल, सोलापूर (97), लोकमंगल जीवक हॉस्पिटल, सोलापूर (19), अकलूज क्रिटिकल केअर ऍण्ड ट्रामा सेंटर (52), कदम मल्टीस्पेशलिस्ट, अकलूज (97), देवडीकर हॉस्पिटल, अकलूज (55), मोनार्क हॉस्पिटल, सोलापूर (14), सुश्रुत हॉस्पिटल, बार्शी (48), जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर (48), पंढरपूर सुपरस्पेशालिस्ट गॅलेक्‍सी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल (54), श्री गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर (88), लाईफ- लाईन सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, पंढरपूर (72), आणि उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर (25).

आपले परम कर्तव्य आहे की आपल्या जिल्ह्यातील हे सर्व दवाखाने खरोखरच गोरगरीब आर्थिक दुर्बलता असणारे लोकांचे उपचार योजनेअंतर्गत करत आहेत कां.?? खरोखरच डॉ आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत का?? दवाखान्यात विविध आरोग्य टेस्ट. केसपेपर. औषधांची किंमत. खाट भाडे. अश्या विविध माध्यमातून रुग्णांची लुट करत आहेत कां?? जेथे उपचार सुरू आहेत त्याच दवाखान्यात मेडिकल आहे आणि असेल तर त्यावर बंदी आली पाहिजे. कोणत्याही डॉ यांनी रुग्णाला लिहून दिलेले औषध दुसर्या गावातील मेडिकल मध्ये मिळाले पाहिजे असा आग्रह आपणं सर्वांनी घेतला पाहिजे. लॅबोरेटरी मध्ये कोणकोणत्या टेस्ट होतात त्यांचे दरपत्रक लावले आहे कां??

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा