You are currently viewing शिवरायांचा पाळणा

शिवरायांचा पाळणा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित पाळणा गीत*

 

—————————————

 *शिवरायांचा पाळणा*

      ( *जीवन पट* )

 

शिवनेरी गडा बाळं जन्मला

कडेकपारी नाद घुमला

सनई चौघडा वाजु लागला

जो बाळा जो जो रे जो ****

 

शहाजी पुत्र गोंडस बाळं

शिवनेरी गडी पाळण्यात खेळं

लिहुन ठेवला सुवर्ण काळ

जो बाळा जो जो रे जो ****

 

भवानी मातेची कृपा जाहली

तलवार लावली बाळाच्या भाळी

नावं *शिवाजी* ऐका मंडळी

जो बाळा जो जो रे जो ****

 

राम कृष्णाच्या ऐकवुन कथा

बाळं शिवबाने जमवला जथा

हरहर महादेव गर्जना आता

जोबाळा जो जो रे जो ****

 

शिवबाळाचे मावळे मित्र

सगळे मिळुनी जमती एकत्र

गनिमी काव्याचे मिळाले छत्र

जोबाळा जो जो रे जो ****

 

मावळे सगळे एकत्र जमले

रायरेश्वराला साकडे घातले

रक्ताच्या थेंबांनी फुले वाहिले

जो बाळा जो जो रे जो ****

 

 

दादाजी कोंडदेव गुरु स्मरोनी

जिजा बाईचे आशिष घेवुनी

हाती घेतली ध्वजा मावळ्यांनी

जो बाळा जो जो रे जो ****

 

आई भवानीला वंदन करोनी

शहाजी पित्याला मनी स्मरोनी

एकेक गडाला घेती जिंकुनी

जो बाळा जो जो रे जो ****

 

बाजी प्रभुणे खिंड लढविली

थोपविला शत्रु मृत्यु झुंजुनी

श्वास सोडला तोफ ऐकुनी

जो बळा जो जो रे जो ****

 

तान्हाजी सुर्याजी भावंडे दोघे

सेवेसी राजाच्या अखंड उभे

नावं कोंढाण्याचे जगात शोभे

जो बाळा जो जो रे जो****

 

सुभेदाराची सुन समोरी

माता म्हणोनि सन्मान करी

चोळी बांगडी तीस, प्रणाम करी

जो बाळा जो जो रे जो ****

 

शिवाजी राजाने डाव साधला

गनिमी काव्याने मोगल नमविला

स्वराज्य तोरण नवा बांधला

जो बाळा जो जो रे जो ****

 

हिंद स्वराज्याचा राजा त्रिभुवनी

झळके पताका उंच गगनी

मुजरा त्याजसी मस्तक नमवुनी

जो बाळा जो जो रे जो****

 

धन्य शिवाजी, धन्य मावळा

उत्साह तयांचा जगा वेगळा

आज दिनी त्यांचा असे सोहळा

जो बाळा जो जो रे जो ****

 

*शीला पाटील. चांदवड.*

मोबा. 9420588765.

प्रतिक्रिया व्यक्त करा