You are currently viewing उध्दव ठाकरे गटाचे खासदार, आमदार करताहेत दिशाभूल..

उध्दव ठाकरे गटाचे खासदार, आमदार करताहेत दिशाभूल..

उध्दव ठाकरे गटाचे खासदार, आमदार करताहेत दिशाभूल – विजय केनवडेकर

मालवण मधील उद्धव ठाकरे गटाने मालवण तालुक्यातील किनारपट्टीतील जनतेला कायम फसवी आश्वासने देऊन खासदार व आमदार जनतेला फसवण्याचा एक कलमी कार्यक्रम करताना पाहावयास मिळतो .दांडी किनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर व आठ दिवसात कामाला सुरुवात अशा प्रकारची माहिती विरोधका कडून प्रसिद्ध करण्यात आली. यासंबंधी २०१७ व १८ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती २०२०/२१ चा अर्थसंकल्पात आर्थिक मंजुरी देण्यात आली आणि आठ दिवसात कामाला सुरुवात होणार आहे असे सांगून मच्छीमारांची व मालवणच्या जनतेची फसवणूक करून धूळपेर केली जात आहे.२०१७/१८ चा अर्थसंकल्पात कोणतीही या कामाची तरतुदीची नोंद नाही.२०२०/२१ मध्ये पण कोणतीही अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद केलेली निदर्शनास येत नाही. अर्थसंकल्पात आर्थिक मंजूर तरतूद झाल्यावर त्याचा आराखडा बनवला जातो .लांबी रुंदी उंची ठरवली जाते .अशा प्रकारचे कोणतेही आदेश पतन विभागाला किंवा महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डा कडे शासनाने दिलेले निदर्शनात येत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजनात हे काम समाविष्ट नाही व तरतूदही नाही किंवा साधी टिपणी पण नाही. असे असताना आठ दिवसात कामाला सुरुवात व कोणता ठेकेदार काम करणार आहे हे घोषित करणे म्हणजे ठेकेदाराला हाताशी धरून जनतेला फसवण्यासारखे आहे. असा एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे गट करताना दिसत आहे .मालवण बंदर जेटी ते मोरेश्वर मंदिर ते मोर्याचा धोड्या पर्यंत बंधारा कम रस्ता व पार्किंग व्यवस्थे साठी मा. नारायण राणे यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बंधाऱ्याची खास बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी अशी लेखी स्वरूपात समक्ष भेटून मागणी केली होती .याचाच पाठपुरावा मा. निलेश राणे साहेब यांनी मा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत मंत्रालयात सुरू केला होता. त्यास अनुसरून धुप प्रतिबंधक बंधाऱ्याचे पहिल्या टप्प्याचे काम २०२२/२३ चा अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे .त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेचे झालेल्या चर्चेचे मंत्रालयातील मिनिट्स भाजपाकडे उपलब्ध आहे.
मालवण शहरात राजकोट मत्स्यजेटीचा विधानसभा निवडणुकीआधी मोठा गाजावाजा करत आमदारांनी शुभारंभ केला होता . याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात देण्यात आली होती .अद्यापही त्याचे इंचभरही काम सुरू झाले नाही . यावेळी ठेकेदार पण जाहीर करण्यात आला होता . सद्यस्थितीमध्ये मत्स्य खात्याकडे चौकशी करता या जेटी साठी शासनाने सीआरझेड ची परवानगी घेतली नसल्याचे हे काम होऊ शकत नाही.असा खुलासा मत्स्य खात्या मार्फेत करण्यात आला .त्याचबरोबर सर्जेकोट येथील मंजूर बंधाऱ्याचा आराखडा वेगळा व प्रत्यक्ष काम वेगळे अशी परिस्थिती निदर्शनात आली . विरोधक बंधाऱ्याची उंची कमी करा लांबी वाढवा असे सांगून ठेकेदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी करताना पाहावयास मिळते . हाच बंधारा मंजूर करताना मच्छीमारांना का विश्वासात घेतले नाही . असा प्रश्न भाजपाला पडत आहे . उंचीवरच्या बंधार्‍यावरून मच्छीमार बोट वरती कशी काढणार आहे हा मोठा जटील प्रश्न होऊन राहिला आहे. कामाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळेच ठेकेदाराने हे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे . देवबाग किनारपट्टीच्या धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी विशेष निधी मा. नारायण राणे यांच्यामार्फत निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला होता . याचे श्रेय भाजपाला व राणे यांना मिळेल यामुळे तात्कालीन पालकमंत्र्यांना हाताशी धरून हा निधी कसा खरची पडणार नाही याचे यशस्वी नियोजन करून देवबाग मधील जनतेला फसवण्याचे काम विरोधकांनी केलेले देवबाग जनता विसरली नाही .
अर्थसंकल्पात धुप प्रतिबंधक बंधाऱ्याची आर्थिक तरतूद नाही . जिल्हा नियोजनाकडे माहिती नाही .पतन विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला कामाबद्दल माहिती नाही .मग हे काम कोणी मंजूर केले कसे मंजूर झाले व याचा आराखडा जनतेसाठी जाहीर करण्यात यावा. विरोधकांन सारखा विरोधाला विरोध हि भुमिका भाजपाची नाही. धुपप्रतिबंधक बंधाऱ्यास भाजपाचा कधीही विरोध नाही . हे काम मार्गस्थी भाजपने प्रथम प्राधान्याने करत आहे . ज्याप्रमाणे चिवला बीच येथे धुपप्रतिबंधक बंधारा कम रस्ता मा. नारायण राणे यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे पूर्ण होऊ शकला त्याच धर्तीवर भाजपा प्रयत्न मा. निलेश राणे यांच्या मार्फत प्रयत्न करीत आहे .विरोधकांनी ठेकेदाराला अमिश दाखवून काम करण्याचा प्रयत्न झाल्यास लेखी तक्रार देऊन चौकशी करण्यासाठी मा. पालकमंत्री व मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निलेश राणे यांच्यामार्फत भाजपा मागणी करणार असल्याचे प्रभारी मालवण शहर विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा