You are currently viewing गिरीजावरा नमो शंकरा

गिरीजावरा नमो शंकरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम अभंग रचना*

*गिरीजावरा नमो शंकरा*

श्री गिरीजावरा ! ॐ नमो शंकरा !
तूंचि कृपाकरा ! बांदेश्वरा !!१!!

लावी भस्म अंगी ! गंगा शोभे भाळी !
चंद्रमा कपाळी ! चन्द्रेश्वरा !!२!!

निलवर्ण तुज ! नागराज गळा !
कंठी मुंडी माळा ! विश्वेश्वरा !!३!!

त्रिशूळ डमरू ! मस्तकी त्रिनेत्र !
धरी हाती शस्त्र ! व्याघ्रेश्वर !!४!!

दूध अभिषेक ! बेल पुष्प वाहू !
भक्तिभावे पाहू ! रुद्रेश्वरा !!५!!

शिव दर्शनाची ! लागे मज आस !
शिवाचाच ध्यास ! मार्लेश्वर !!६!!

ॐ नमो शिवाय ! मंत्र असे मुखी !
जगी सर्व सुखी ! जनार्दन !!७!!

©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा