You are currently viewing आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वक्तृत्व स्पर्धेत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा सचिन खेडेकर प्रथम

आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वक्तृत्व स्पर्धेत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा सचिन खेडेकर प्रथम

कणकवली

आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर अकरावी ते पंधरावी गटात प्रेरणा सचिन खेडेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा १८ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वा. कुडाळ उद्यमनगर येथीला वासुदेवानंद सरस्वती हॉल येथे होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी सभापती तथा भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, माजी उपसभापती तथा भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगांवकर, प्रा. हरिभाऊ भिसे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, तालुकाध्यक्ष गणेश तळगांवकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : सातवी ते दहावी गट रिया विश्वनाथ सावंत, ३. सान्वी रघुनाथ काणेकर, उत्तेजनार्थ रिया दीपक गांवकर, – – २. ऐश्वर्या महेश देसाई, विधी विरेंद्र चिंदरकर, मेघा प्रवीण दळवी. अकरावी ते पंधरावी गट – २. अंकुर श्रीकृष्ण सोवनी, ३. सौरभ मधुकर पेंडकलकर, उत्तेजनार्थ साईल सुभाष तोरसकर, मालिनी सचिन लाड स्पर्धेचे परिक्षण प्रा. हरिभाऊ भिसे व प्रा. एस. आर. दर्पे यांनी केले.

वरील यशस्वी स्पर्धकांची १८ फेब्रुवारीला कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंतिम फेरीसाठी प्रथम पारितोषीक १५ हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ५ हजार, उत्तेजनार्थ ३ हजार तसेच प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा