You are currently viewing गझल अमृत’ला उत्कृष्ट दिवाळी अंकाचा बहुमान

गझल अमृत’ला उत्कृष्ट दिवाळी अंकाचा बहुमान

*’गझल अमृत’ला उत्कृष्ट दिवाळी अंकाचा बहुमान*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित दिवाळी अंक स्पर्धेमध्ये गझल मंथन प्रकाशन संस्थेच्या ‘गझल अमृत’ दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंकाचा बहुमान प्राप्त झाला आहे. डाकेवाडी ता. पाटण जिल्हा सातारा इथे समारंभपूर्वक ‘गझल अमृत’ दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंकाचा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. गझल अमृत दिवाळी अंकाचे मुख्य संपादक जयवंत वानखडे आहेत. ‘गझल अमृत’ दिवाळी अंकाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी डॉ. शिवाजी काळे, प्रमोद खराडे आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी तर व्यवस्थापकिय संपादक पदाची जबाबदारी निलेश कवडे यांनी पार पाडली आहे. गझल मंथन साहित्य संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार उर्फ वसुदेव गुमटकर सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, कोषाध्यक्ष प्रशांत रामगीरवार आणि प्रसिद्धीप्रमुख भरत माळी तसेच गझल मंथन साहित्य संस्थेची मुख्य मार्गदर्शक समिती संपादक मंडळाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दर्जेदार दिवाळी अंकाची निर्मिती करत आहे. गझल अमृत दिवाळी अंकाची प्रकाशन पूर्व १०० % विक्री होत असते हे विशेष महत्वाचे आहे. गझल रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अल्पावधीतच ‘गझल अमृत’ दिवाळी अंकाने दिवाळी अंक विश्वात आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. यंदाच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील नामवंत मान्यवर गझलकारांचे अभ्यासपूर्ण लेख आहेत. सोबतच महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक नामवंत मराठी गझलकारांच्या गझलांचा समावेश आहे. ‘गझल अमृत’ संग्रही ठेवण्यासाठी तसेच संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त असलेला दर्जेदार दिवाळी अंक झाला आहे. २०२१ च्या ‘गझल अमृत’ दिवाळी अंकाला ‘चिरांगन’ दिवाळी अंक पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले होते. नेहमीच अभिनव उपक्रम राबवून गझलक्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवणारी गझलमंथन साहित्य संस्था महाराष्ट्रात एक उत्कृष्ट गझलसंस्था म्हणून नावाजली जाते. संस्थेच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या गझल कार्यशाळा आणि मुशायरे अत्यंत यशस्वीपणे पार पडत आहेत. लवकरच संस्थेचे गझलेला समर्पित मासिक येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा