बोलेरो पिकअप ८ फूट खोल दरीत कोसळली, दोन महिला जखमी ; पाडलोस येथील घटना

बोलेरो पिकअप ८ फूट खोल दरीत कोसळली, दोन महिला जखमी ; पाडलोस येथील घटना

बांदा

पाडलोस विठ्ठलादेवी बस स्टॉपजवळ एसटीला बाजू देताना सुसाट वेगात असलेली बोलेरो पिकअप सुमारे ८ फूट खोल घळणीत कोसळली. या अपघातात दोन परप्रांतीय कामगार महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत स्थानिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरोडा – बांदा एसटी बस बांद्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी पाडलोसवरुन आरोसच्या दिशेने सुसाट वेगात बोलेरो पिकअप जात होती. त्यात चालकासह चार महिला, दोन लहान मुले व अन्य एक पुरूष कामगार होता. पिकअपमध्ये माती भरलेली होती. एसटीला वेगातच बाजू देत असताना रस्त्यालगत असलेल्या झाडाला कार आदळली व सुमारे ८ फूट खोल शेतात कोसळली.

प्रतिक्रिया व्यक्त करा