You are currently viewing IPL 2021 Mumbai Indians: लिलावानंतर कशी आहे आता रोहित शर्माची   ‘पलटण ‘

IPL 2021 Mumbai Indians: लिलावानंतर कशी आहे आता रोहित शर्माची ‘पलटण ‘

आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईने (Mumbai Indians) गुरूवारी झालेल्या लिलावात (IPL Auction 2021) त्यांचे सात स्लॉट भरले आहेत. लिलावाच्याआधी टीमला परदेशी फास्ट बॉलरची गरज होती, त्यामुळे त्यांनी न्यूझीलंडच्या ऍडम मिल्नेला (Adam Milne) 3.20 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. तर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलवर (Nathan Coulter Nile) मुंबईने 5 कोटींची बोली लावून त्याला पुन्हा टीममध्ये घेतलं.

फास्ट बॉलरचा कोटा संपल्यानंतर मुंबईची नजर दिग्गज आणि अनुभव स्पिनर असलेल्या पियुष चावलावर ( Piyush Chawala ) होती.

दिल्लीसोबत लिलावातल्या लढाईनंतर मुंबईने पियुष चावलाला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतलं. 32 वर्षांचा पियुष चावला आयपीएल 2021 मध्ये राहुल चहर आणि कृणाल पांड्यासोबत टीमची स्पिन बॉलिंग आणखी मजबूत करतील.

मुंबईने न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशमला (James Neesham) 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. हार्दिक पांड्याचा बॅक-अप म्हणून नीशम टीममध्ये अेसल, तसंच युद्धवीर चरक या अनकॅप खेळाडूसाठी मुंबईने 20 लाख रुपये दिले. दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर मार्को जेन्सन (Marco Janson) यालाही मुंबईने 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. मार्कोला झहीर खान मागच्या दोन वर्षांपासून बघत होता. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरही मुंबईने 20 लाख रुपयांची बोली लावली.

लिलावानंतर मुंबई इंडियन्सची पूर्ण टीम.

रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंदुलकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 17 =