*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्किझोफ्रेनिया ….!!!*
डोळ्यांत झोप मावत नाही
डोळ्यांत स्वप्नं मावत नाही
रात्र ही आता परकी वाटते
दिवसही सरता सरत नाही …!
परकी माणसं जवळ बसतांत
ओळखीचे न सांगता निघून जातात
दाराआडून लपून बघत चिडवतात
अंगावर धावून कर्कश ओरडतात ..!
माझ्या वाईटावरच आहेत सारे
पाठलाग माझा करीत आहेत
समोर त्यांनीच खड्डा खणला
मला त्यात गाडणार आहेत ..!
मृत व्यक्ती माझ्याशी बोलतात
तेच माझ्या शेजारी बसतात
मी त्यांना मीठीत घ्यायला धावतो
अंथरूणावर पाली साप वळवळतात..!
वेळेच आता भान नाही
हाक मारायला आवाज फुटत नाही
शब्द ही नुसते !तोंडातून गळतांत
मला पुसायला जमतही नाही ..!
डोळेही ओळख विसरून गेलेत
अंगावर किडे मुंग्या चढल्यांत
दूरवर माझ्या नावाची हाक ऐकू येते
आता !!! घरी परत जावसं वाटतं..!
घर दिसत..परत जावसं वाटतं..!!?!!
बाबा ठाकूर धन्यवाद