You are currently viewing शुभंकरोती उपक्रम

शुभंकरोती उपक्रम

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

॥शुभंकरोती उपक्रम ॥

*बाबा साहेब …*

डॅा. डॅाक्टर होते मानवतेचे माणुसकी परिभाषा

बा बा शोभले खरोखरी ते जगताची आशा….

बा वरलेल्या जगास दिधले परिमाण नवे एक

सा धुसंतांपरी वागणे नीति होती नेक…..

हे टाळणीला गेले सामोरे सोसले खूप खूप

ब रेच पाणी गेले वाहूनी राहिले तरी मूक..

आं बेडकर तो एकच झाला राहिल फक्त एक

बे रीज केली सदा जीवनी नाही एकही चूक…

ड गमगले ना स्वत: कधी ही नित्य दाविली दिशा

क धी न केली द्रोहाची हो चुकून ही भाषा ….

र जतम भावा अव्हेरूनी हो सत्व राखले उरी

आंबेडकर हा जन्मावा हो पुन्हा तो घरोघरी …

॥शतश: नमन ॥

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १४ एप्रिल २०२२
वेळ : १ : ४८ दुपारी

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 1 =