You are currently viewing कणकवली शहरात कबड्डीपटू नक्की घडतील- समीर नलावडे

कणकवली शहरात कबड्डीपटू नक्की घडतील- समीर नलावडे

विराज स्पोर्ट्स मित्रमंडळतर्फे प्रकाश सावंत चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

कणकवली

विराज स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित कै.प्रकाश सावंत चषक वर्ष १ले भव्य कबड्डी स्पर्धा पोदार इंटरनॅशनल स्कूल समोर मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस व गणपती मूर्तीस पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी समीर नलावडे म्हणाले, वरचीवाडी हा ग्रामीण भाग मानला जाणार नाही. पोदार इंटरनॅशनल स्कूल हे मोठ ध्येय आ.नितेश राणे यांच्या नेतृत्वामुळे आले. तसेच स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान कणकवलीच्या विकासासाठी आहे.
बदलानुसार मॅटवर कबड्डी स्पर्धा मॅटवर इनडोर खेळवल्या जातात. प.पू. भालचंद्र महाराज संस्थान जवळ कबड्डीसाठी इनडोअर मैदान उभारले आहे. पुढील कबड्डी स्पर्धा मॅटवर सुद्धा झाल्या पाहिजेत. प्रो कबड्डी खेळामुळे कबड्डीची लोकप्रियता वाढत आहे. जानवली गावचा सुपुत्र प्रणय राणे प्रो कबड्डीमध्ये खेळतो ही आनंदाची गोष्ट आहे. तो सर्वांच्या आशीर्वादाने देशाच्या टीममध्ये खेळेल. तसेच युवक- युवतींसाठी असे कार्यक्रम राबवत असेल तर मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक ॲड. विराज भोसले, रवींद्र गायकवाड, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, अभय राणे, आयोजक प्रशांत सावंत, सदानंदा राणे, मंगेश राणे, अंबाजी राणे, मेहुल धुमाळे, भरत उबाळे, तालुका उपाध्यक्षा संजना सदडेकर, साक्षी आमडोसकर, लावण्या सावंत, मेघा आमडोसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सत्कार करण्यात आले. यामध्ये आबा केरकर, प्रमोद सावंत, सेवानिवृत्त शासकीय दुग्ध डेअरी रामदास गुरव, सेवानिवृत्त नायब तहसीलदार मधुकर जाधव यांचे सत्कार नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर राणे यांनी केले तर सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा