You are currently viewing देव-मामलेदारांची भेट घेउनी

देव-मामलेदारांची भेट घेउनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली- काव्यपुष्प-१२ वे*
—————————————–

देव-मामलेदारांची भेट घेउनी
श्रीमहाराज अक्कलकोट आले
थोर विभूती स्वामीच्या दर्शनाने
मनोमनी समाधान हो पावले ।।

स्वामी म्हणती “बाळ माझा ” नि
प्रेमाने स्वामी श्रीमहाराजा सांगती
ऐक बाळ -तुझे काम माझ्याकडे नाही ” …!
श्रीमहाराज मग प्रसाद घेउनी निघाले ।।

श्रीमहाराज हुमणाबाद गावी आले
श्रीमाणिकप्रभू या सिद्धपुरुषा भेटले
म्हणाले ,योग्य वेळी तुझे काम होईल “,
घेउनी निरोप त्यांचा श्रीमहाराज निघाले ।।

कवीअरुणदास म्हणे – काव्यलेखनाचा हा
योग परम भाग्याचा मज हो लाभला ।।
————————————-
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली- काव्यपुष्प-१२ वे
-कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

प्रतिक्रिया व्यक्त करा