You are currently viewing कणकवली नगरपंचायतीकडून कोरोना काळात पती गमावलेल्या १५ महिलांना आर्थिक मदत 

कणकवली नगरपंचायतीकडून कोरोना काळात पती गमावलेल्या १५ महिलांना आर्थिक मदत 

शहरातील महिलांसाठी नगरपंचायत कायम पाठीशी राहील – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

कणकवली शहरातील कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना कणकवली नगरपंचायतच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील १५ महिलांना ही मदत देण्यात आली आहे. शहरात २० महिलांनी आपले पती कोविड काळात गमावले होते,इतरांना कागदपत्रे पूर्तता झाल्यानंतर मदत करण्यात येईल.या शहरातील महिलांसाठी नगरपंचायत कायम पाठीशी राहील असा विश्वास नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला. संपूर्ण राज्यात असा उपक्रम राबवणारी कणकवली नगरपंचायत ही पहिली नगरपंचायत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले नगरसेविका मेघा गांगण, बाबू गायकवाड,महेश सावंत,अजय गांगण,किशोर राणे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायतच्या वतीने सुरेखा सुरेश चव्हाण,संगीता कृष्णा सावंत,सायली संदीप पिळणकर,वनिता विलास तयाशेटे,सुप्रिया दर्पण नानचे,दिपाली दिपक बागवे,दिपाली दिलीप मुसळे,रेणुका राजेश हर्णे,प्रतिभा सुरेश माणगावकर,मनीषा केशवराव पवार,सुनिता कृष्णा चव्हाण,आरती राजेश धुरी,राजश्री राजेंद्र कडुलकर,अनिता आनंद तांबे,सुनिता दिगंबर रेवडेकर या १५ महिलांना प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी काही महिलांना अश्रू अनावर झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा