You are currently viewing श्री समर्थ रामदास

श्री समर्थ रामदास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”श्री समर्थ रामदास”*
रामदास कवी शास्त्रज्ञ अनन्य संत
योगी समर्थ रामदासांना करू वंदन।।ध्रु।।

मारुती श्रीरामाचे स्वामी निस्सीम भक्त
करिती भारत-भ्रमण धर्म प्रचारार्थ
दाविती प्रचिती अज्ञान दूर करीत।।1।।

गायत्री पुरश्चरण नित्य तप करीत
भिक्षा मागून चालविती चरितार्थ
उद्घोषती जय जय रघुवीर समर्थ।।2।।

नित्य व्यायाम साधना यष्टी बलदंड
मारुतीची असंख्य मंदिरे केली स्थापित
ब्रह्मचर्य व्रती सदा आचरण शुद्ध।।3।।

मनाचे श्लोक ओव्या शिकवती जीवनार्थ
गावोगावी करिती भजन किर्तन प्रवचन
जन जागृती करिती द्रष्टे विचारवंत।।4।।

अंगी भस्म गळा रुद्रमाळ झोळी काखेत
हाती कुबडी पीतवर्ण तेज अघटित
शुद्ध सात्विक निस्वार्थी अन्याय दूर करीत।।5।।

भीमरूपी स्तोत्र सार आहे विश्व विख्यात
अंतराळ तज्ञ खगोल शास्त्र सर्व जाणत
गणिती अंतर्ज्ञानी निद्रिस्तांना करी जागृत।।6।।

हिंदू राष्ट्र निर्मिती आसक्ती ध्येय उद्दिष्ट
विश्वाला मार्ग दर्शवी दासबोध ग्रंथ
कल्याणासम त्यांचे असंख्य शिष्य भक्त।।7।।

सर्वज्ञ वेद पुराण संपन्न संगीतज्ञ
दासबोध लिहिला त्यांनी शिवथर घळीत
सज्जनगड वासी स्वधर्मे सूर्य पहात।।8।।

काव्य:श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eight =