गणपत केळुसकर यांचे निवेदन
वेंगुर्ला :
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नवाबाग झुलता पुलाशेजारी आवश्यक असलेला विविध विकास कामांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मच्छिमार सेल तालुका प्रमुख गणपत केळुसकर यांनी मंत्री केसरकर यांना निवेदन सादर करुन लक्ष वेधले आहे. तसेच येथील विकास कामांसाठी ग्रामीण पर्यटन विकास योजनेमधून अथवा सिंधुरत्न समुद्धी योजनेमधून निधी मिळावा अशी मागणी केली आहे.
विकासकामांमध्ये नवाबाग आवार ते झुलता पूलापर्यंत जाणा-या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, झुलत्या पुलाजवळ नविन प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधणे, नवाबाग समुद्र किना-यावरील पथवेवर नविन विद्युत व्यवस्था कार्यान्वित करणे, नवाबाग समुद्र किना-यावर २५ बेंचची नविन बैठक व्यवस्थान निर्माण करणे आदींचा समावेश आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, वेंगुर्ला प्रवक्ता सुशिल चमणकर, उभादांडा विभाग प्रमुख प्रकाश मोटे, उपविभागप्रमुख शिवाजी पडवळ आदी उपस्थित होते.