You are currently viewing हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गोशाळा बांधकाम शुभारंभ !

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गोशाळा बांधकाम शुभारंभ !

देवगड :

 

श्री. स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री. स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील नियोजित गोशाळेच्या बांधकामाचा शुभारंभ ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर धाकू राणे व सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्वामी भक्तांच्या उदार देणगी मधून सदर गोशाळा मठा शेजारी उभारण्यात येत आहे. मठाचे मुख्य देणगीदार स्वामी भक्त श्री. माधव श. भाटकी यांचा गोशाळेच्या बांधकाम निधीसाठी मोलाचा वाटा असल्याचे यावेळी नंदकुमार पेडणेकर म्हणाले. सर्व देणगीदात्यांचे श्री. स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांनी आभार मानले आहेत. यावेळी प्रवीण घुगे, शिवलिंग जंगम, स्वप्नील लोके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा