You are currently viewing वेंगुर्लेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन

वेंगुर्लेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन

महाअधिवेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते..

 

वेंगुर्ले:

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा-शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्याय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गेली ६१ वर्षे चळवळीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषद व सत्कार समारंभ तर १६ फेब्रुवारी रोजी १७ त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन होणार आहे.

या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर केंद्रीय सूक्ष्म व लघु मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवरांसह राज्यभरातील सुमारे एक लाख शिक्षक यावेळी उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा